डोकेदुखीवर घरगुती उपाय
डोकेदुखीवर घरगुती उपाय पाहताना प्रथम आपण त्याची कारणे काय आहेत व लक्षणे काय आहेत ते पाहूया.
डोकेदुखीची कारणे
- पोटात गॅस होणे,
- उच्च रक्तदाब असणे,
- नजर कमजोर होणे,
- अति परिश्रम करणे,
- झोप अपुरी होणे,
- सतत टी व्ही पाहणे,
- मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर करणे,
- बद्धकोष्ठता असणे,
- जास्त तणाव असणे,
- पोट रिकामे असणे,
- अवेळी खाणे,
- रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे,
- कडक उन्हात जास्त वेळ राहणे,
- वारंवार उपास करणे, व
- जास्त प्रमाणात नशा/व्यसन करणे.
डोकेदुखीची लक्षणे

डोकेदुखीची लक्षणे
- मान दुखणे,
- पाठ दुखणे,
- भूक कमी होणे,
- चक्कर येणे,
- खांदे जड होणे, तसेच
- अशक्तपणा येणे.
डोकेदुखीवर घरगुती उपाय

डोकेदुखीवर घरगुती उपाय
- बदाम तेलात कापूर घालून कपाळावर मसाज केल्याने डोकेदुखी थांबते.
- लवंग वाटून त्याचा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखी थांबते.
- आल्याचा रस एक चमचा व मध एक चमचा पाण्यात मिसळून जेवणानंतर सकाळी, संध्याकाळी घेतल्याने डोकेदुखीत आराम पडतो.
- गाईच्या दुधात सुंठ घासून त्याचा लेप कपाळावर लावून त्यावर कापूस लावावा असे केल्याने सात ते आठ तासात तीव्र डोकेदुखी थांबते.
- एक कप कोरा चहा त्यात लिंबू पिळून हळद व आल्याचा रस घालून घेतल्या ने डोकेदुखी थांबते.
- जायफळ उगाळून त्यात वेलची पूड घालून लेप तयार करावा हा लेप कपाळावर लावल्याने डोकेदुखीत आराम पडतो.
- दालचिनी उगाळून त्याचा लेप कपाळावर लावल्याने डोके दुखायचे थांबते.
- गाईचे तूप दोन थेंब नाकात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
- कोमट तेलाने डोक्याला मसाज केल्याने डोकेदुखी थांबते.
- लवंग पावडर कोमट दुधातून घेतल्या डोकेदुखीत आराम पडतो.
- एक कप दुधात भिजवलेले चार ते पाच बदाम घालून ते चांगले उकळून घ्यावे.
- उपाशीपोटी सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखी थांबते.
- लिंबाची साल सुकवून त्याची पूड करून त्यात पाणी घालून ही पेस्ट कानशिलावर लावल्याने डोकेदुखी थांबते.
- दोन ते तीन वेलदोडयाचे चूर्ण त्यात अर्धा चमचा पिंपळीचे चूर्ण आणि मध एकत्र करून चाटण घेतल्याने डोकेदुखी थांबते.
- चंदन पाण्यात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
- दोन चमचे आवळा चूर्ण एक चमचा तूप मिसळून खावे वरून एक पेला कोमट दूध प्यावे यामुळे डोके दुखी थांबते.
- सुंठ पाण्यात किंवा दुधात उगाळून त्याचा लेप कपाळावर लावल्याने डोके दुखीत आराम पडतो.
- अर्धवट कच्चा पेरु पाण्यात उगाळून कपाळावर लेप केल्याने डोके दुखी थांबते.
- ओव्याची पेस्ट करून ती कपाळावर लावल्याने डोके दुखी वर आराम पडतो.
डोकेदुखीवर घरगुती उपाय करताना, कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी टाळाव्या
आता आपण डोकेदुखीवर घरगुती उपाय करताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी टाळाव्या हे पाहूया.
हे करा
- नियमित व्यायाम करणे.
- दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणे.
- जेवण नेहमी प्रमाणे करणे जेवण टाळू नये.
- प्रखर प्रकाश व मोठा आवाज या पासून दूर राहावे.
- हिरव्या पालेभाज्या व मोसमी फळे जसे-गाजर, खीरा,पालक,मेथी हे खावे.
- रात्री हलका व फायबर युक्त आहार घेणे.
- डोक्यावर बर्फ किंवा थंड पाण्याची पट्टी ठेवणे.
हे टाळा
- जादा वेळ टी व्ही पाहणे टाळावे.
- मोबाईलचा अति वापर करू नये.
- जास्त गरम किंवा जास्त थंड हवामानात बाहेर पडू नये.
- जास्त उग्र वास असणारे परफ्यूम टाळावे.
- उपवास करु नयेत.
- जास्त तणाव घेऊ नये.
निष्कर्ष
लेखामध्ये डोकेदुखीवर घरगुती उपाय नमूद केल्याप्रमाणे डोकेदुखी ही खरं पाहता फारच किरकोळ बाब आहे, असे वाटते परंतु डोकेदुखीची कारणे व डोकेदुखीची लक्षणे लक्षात घेता हि फारच गंभीर बाब आहे जी आपल्याला, आपल्या भविष्यात येणाऱ्या शारीरिक व्याधींचे संकेत देते.
यामुळे, नमूद केलेल्या उपायांचा विचार व उपयोग करावा. नमूद केलेले सर्व उपाय हे दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या घटकांना लक्षात घेऊन तसेच, स्वअनुभवावरून मांडण्यात आले आहेत.
sturse
It is remarkable, rather valuable idea
अनिल साहेबराव महाडिक
डोकेदुखी वरील उपाय घरगुती असल्यामुळे कोणतेही साईड इफेक्टस होण्याचा संभव नाही. शिवाय हे सर्व उपाय घरच्या घरी , रात्री-बेरात्री करता येणं शक्य आहे. खूपच चांगली आणि गरजेची ही माहिती संग्रही जपून ठेवण्यासारखी अशीच आहे.
अभिजित
एक उत्तम माहिती संग्रह.
सुनिता साळुंखे
खूप छान व उपयोगी माहिती.