मित्रांनो अगदी साध्या साध्या गोष्टी असतात परंतु आपल्याला त्याचे ज्ञान नसते त्यामुळे आपण किरकोळ आजारासाठी सुद्धा डॉक्टरांकडे धाव घेतो. त्या साध्या सोप्या गोष्टी आपणास माहीत व्हाव्यात एवढीच इच्छा.
सर्दीवर घरगुती उपाय
सर्दीवर घरगुती उपाय पाहताना प्रथम आपण त्याची कारणे काय आहेत व लक्षणे काय आहेत ते पाहूया.
सर्दीची कारणे
- ऋतुमानातील बदल,
- सततचा प्रवास,
- व्हायरल इन्फेक्शन,
- अलेर्गी ,
- खाण्या पिण्यातील बदल,
- प्रदूषण,
सर्दीची लक्षणे
- नाक वाहणे
- शिंका येणे
- घसा दुखणे,
- बारीक-बारीक ताप येणे,
- डोके दुखणे,
- डोळयातून पाणी येणे,
- चिडचिड होणे,
सर्दीवर घरगुती उपाय

सर्दीवर घरगुती उपाय
- तुळशीचा रस दोन चमचे, दोन ते तीन लसूण ठेचून घेणे, अर्धा चमचा सुंठेचे चूर्ण, चार ते पाच काळीमिरीचे चूर्ण घालून अर्धा लीटर दुधात घालून चांगले उकळून सकाळी व संध्याकाळी घेतल्याने सर्दी मध्ये आश्चर्यकारक फायदा होतो. सर्दीवर हा रामबाण उपाय आहे.
- ताज्या दहयात काळी मिरी चूर्ण एक चमचा व थोडा गूळ घालून खाल्याने सर्दी बरी होते.
- कापूर घेऊन त्याचा बारीक चुरा करून तो चुरा रुमालात ठेवून त्याचा वास घेत राहिल्याने सर्दी मध्ये चांगला फायदा होतो.
- कांदा किसून त्याचा एक चमचा रस व एक चमचा मध हे चांगले एकजीव करावे व लगेच घ्यावे.
- एक ग्लास दूधात एक इंच आले किसून, दोन ते तीन लवंगा व सात ते आठ काळ्या मिरी घेऊन याचे चूर्ण करुन घालून अर्धा चमचा हळद व छोटा गुळाचा खडा घालून या सर्वांचा काढा करून सकाळी- संध्याकाळी घेतल्याने सर्दीमध्ये चांगला फायदा होतो.
- दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून घ्यावे.
- सुंठेचे चूर्ण दालचिनी पावडर प्रत्येकी एक – एक चमचा घेऊन त्यात खडीसाखर घालून त्याचा काढा करून पिल्याने सर्दी मध्ये फरक पडतो.
- सुंठेचे चूर्ण दोन चमचे, गूळ दोन चमचे, आणि तूप एक चमचा घेऊन एकत्र करावे नंतर त्यात थोडे पाणी घालून गॅस वर ठेवावे ते रबडी प्रमाणे बनवून रोज सकाळी हे चाटण घेतल्याने सर्दी बरी होते.
- ओव्याची धुरी घेणे.
- रोज सकाळी सात ते आठ तुळशीची पाने आणि दोन ते तीन काळी मिरी खाल्याने सर्दी बरी होते.
- गरम दुधात मिरपूड व साखर घालून प्यायल्याने सर्दी मध्ये चांगला फायदा होतो.
- सुंठेचे चूर्ण घेऊन त्यात गूळ व थोडे तूप घालून त्याचे छोटे लाडू करावेत हे लाडू रोज सकाळी एक – दोन खाल्याने सर्दी बरी होते.
- लवंगा पाण्यात टाकून ते पाणी चांगले उकळा ते पाणी पिले असता सर्दीमध्ये फायदा होतो.
- हळदीची पूड विस्तवावर टाकून तो धूर हुंगलयाने सर्दी बरी होते.
- काळी मिरीचे चूर्ण, दही व गूळ एकत्र करून खाल्याने जुनाट सर्दी बरी होते.
- ओवा वाटून त्याची पूड कोमट पाण्याबरोबर घेतल्याने सर्दी बरी होते.
- ओवा वाटून त्याची पुरचुंडी करून ती हुंगत राहिल्याने सर्दी नाहीशी होते.
- पुदिन्याचा रस त्याचे थेंब नाकात सोडल्याने सर्दी बरी होते.
सर्दीवर घरगुती उपाय करताना, कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी टाळाव्या
आता आपण सर्दीवर घरगुती उपाय करताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी टाळाव्या हे पाहूया.
हे करा
- कोमट पाणी पिणे,
- विश्रांती घेणे,
- शिंकताना व खोकताना नाकावर-तोंडावर रुमाल ठेवा,
- क जीवनसत्त्व असणारे पदार्थ खावे,
- नेहमीचा साधा आहार घेणे,
- कडुनिंबाचा काढा घेणे.
हे टाळा
- प्रवास टाळा,
- अतिरिक्त जेवण टाळा,
- बाहेरचे पदार्थ खाऊ नये,
- थंड पाण्याची अंघोळ टाळावी,
- आईसक्रीम खाऊ नये.
- फळे खाणे टाळावे.
निष्कर्ष
लेखामध्ये सर्दीवर घरगुती उपाय नमूद केल्याप्रमाणे सर्दी ही खरं पाहता फारच किरकोळ बाब आहे, असे वाटते परंतु सर्दीची कारणे व सर्दीची लक्षणे लक्षात घेता हि फारच गंभीर बाब आहे जी आपल्याला, आपल्या भविष्यात येणाऱ्या शारीरिक व्याधींचे संकेत देते. यामुळे, नमूद केलेल्या उपायांचा विचार व उपयोग करावा. नमूद केलेले सर्व उपाय हे दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या घटकांना लक्षात घेऊन तसेच, स्वअनुभवावरून मांडण्यात आले आहेत.
सचिन साळुंखे
अतिशय सुंदर माहिती. तसेच घरगुती आणि सोपे उपाय.