सर्वांशी सुख लाभावे। जशी आरोग्य संपदा।
कल्याण व्हावे सर्वांचे। कोणी दुःखी असू नये।।
मेद व चरबीवर घरगुती उपाय
मित्रांनो आता आपण चरबी किंवा मेद वाढल्यास कोणते उपाय करावे हे पाहणार आहोत पण त्या पूर्वी त्याची कारणे काय आहेत हे पाहू या.
मेद व चरबीची कारणे
- चुकीची आहार पद्धती.
- जेवणाच्या अयोग्य वेळा.
- शारिरीक कष्ट कमी करणे.
- सतत बैठे काम करणे.
- फास्ट फूड जास्त प्रमाणात खाणे.
मेद व चरबीवर उपाय

मेद व चरबीवर घरगुती उपाय
- एका लिंबाच्या रसात दोन चमचे मध घालून चाटून खाल्याने शरीरातील चरबी कमी होते.
- लसणाचा रस एक चमचा, मध एक चमचा व चार चमचे पाणी घालून सकाळी व संध्याकाळी प्यावे यामुळे चरबी कमी होते.
- रोज दुपारचे जेवण झाल्यावर लगेच अर्धा लिंबू एक ग्लास गरम पाण्यातून घ्यावा याने चरबी कमी होते.
- खोबरेल तेल दोन चमचे विक्स अर्धा चमचा दोन ते तीन कापूर वडया हे सर्व मिश्रण एकजीव करावे व ज्या भागावर चरबी आहे त्या भागावर चोळणे चरबी कमी होण्यास मदत होते.
- आलं, तुळस, चार ते पाच काळीमिरी उकळून त्याचा काढा करून त्यात एक चमचा मध व अर्धा लिंबू पिळून हा काढा प्यावा.
- एक ग्लास गरम पाणी अर्ध्या लिंबाचा रस, पाव चमचा हळद व एक चमचा मध मिसळून हे मिश्रण चांगले ढवळून सकाळी उपाशी पोटी घेणे हा उपाय पाच ते सहा दिवस करावा.
- कोथिंबीरीचा रस दोन चमचे त्यात अर्धा लिंबू पिळून एक चमचा मध घालून नियमित प्यावे.
- एक लिटर पाणी गरम करत ठेवणे त्यात दोन तमालपत्र, दोन ते तीन इंच दालचिनी तुकडा, दोन वेलची, एक चमचा जिरे या सर्वांचा काढा करून तो तीन भागात विभागणे सकाळी उपाशी पोटी, दुपारी जेवणानंतर अर्ध्या तासाने व रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने असे दिवसातून तीन वेळा एक – एक ग्लास घेणे.
- धने व जिरे भाजून त्याची भरडपूड करून ही भरडपूड सकाळी व रात्री जेवताना किंवा जेवणानंतर खाऊन त्यावर पाणी प्यावे.
- जेवणात कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचे सूप घेतल्याने चरबी कमी होते.
- दोन तेधने व जिरे भाजून त्याची भरडपूड करून ही भरडपूड सकाळी व रात्री जेवताना किंवा जेवणानंतर खाऊन त्यावर पाणी प्यावे.
- जेवणात कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचे सूप घेतल्याने चरबी कमी होते.
- दोन ते तीन लसूण पाकळ्या, अर्धा चमचा आल्याचा रस, अर्धा चमचा सैंधव मीठ आणि अर्धा चमचा तूपात भाजलेला हिंग एकत्र करून खाल्याने चरबी कमी होण्यास मदत होते.
- रोज सकाळी उपाशी पोटी दोन पिकलेले टोमॅटो खाल्याने चरबी कमी होते.
- एक ग्लास गरम पाण्यातून अर्धे लिंबू पिळून मीठ किंवा साखर न घालता रोज सकाळी नियमित प्यावे यामुळे चरबी कमी होते.
- एक चमचा जिरे पावडर एक कप गरम पाण्यात घालून त्यात अर्धा लिंबू पिळून सकाळी उपाशी पोटी घेणे चरबी कमी होण्यास मदत होते.
- जिरे, ओवा व बडीशेप यांची पूड करणे ही पूड जेवणानंतर एक चमचा कोमट पाण्यातून घेणे.
- जेवणापूर्वी तीन ते पाच ग्रॅम गूळ खावा व जेवणानंतर अर्धा चमचा तीळ चावून खावे त्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणे याने चरबी कमी होते.
मेद व चरबीवर घरगुती उपाय करताना, कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी टाळाव्या
आता आपण सर्दीवर घरगुती उपाय करताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी टाळाव्या हे पाहूया.
हे करा
- जेवणा-खाण्याच्या वेळा निश्चित असाव्यात.
- नाश्ता-जेवण यामध्ये तीन तासांचे अंतर असावे.
- रात्रीच्या जेवणानंतर शतपावली घालावी.
- जेवणापूर्वी एक तास भरपूर पाणी प्यावे.
- दररोज व्यायाम करावा.
- आहारात नियमित पालक, पपई, दही, पेरू, कांदा, लसूण, दालचिनी, मध अशा पदार्थांचा समावेश करावा.
- प्रोटीन आणि फायबर युक्त आहार घेणे.
- रात्री हलका आहार घेणे.
हे करा
- स्निग्ध पदार्थ खाणे टाळावे.
- बटाटे -रताळी असे पचायला जड पदार्थ खाऊ नये.
- जेवणा खाण्याच्या वेळा निश्चित असाव्यात.
- रात्रीचे जेवण भरपेट नसावे.
- वरचेवर एक सारखे खाऊ नये.
- मांसाहार, तेलकट पदार्थ, गोड व मैदयाचे पदार्थ, फास्ट फूड खाणं टाळावे.
- जेवणानंतर कधीही लगेच पाणी पिऊ नये.
निष्कर्ष
लेखामध्ये मेद व चरबीवर घरगुती उपाय नमूद केल्याप्रमाणे मेद व चरबी ही खरं पाहता फारच किरकोळ बाब आहे, असे वाटते परंतु मेद व चरबीची कारणे व लक्षणे लक्षात घेता हि फारच गंभीर बाब आहे जी आपल्याला, आपल्या भविष्यात येणाऱ्या शारीरिक व्याधींचे संकेत देते. यामुळे, नमूद केलेल्या उपायांचा विचार व उपयोग करावा. नमूद केलेले सर्व उपाय हे दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या घटकांना लक्षात घेऊन तसेच, स्वअनुभवावरून मांडण्यात आले आहेत.